कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील दोन्ही प्रमुख मॉडेल्स, ChatGPT आणि DeepSeek, भांडवलशाही (Capitalism) आणि समाजवाद (Socialism) यांच्या प्रतीकांप्रमाणे दिसतात. OpenAI द्वारे विकसित ChatGPT हे एक खाजगी मालकीचे मॉडेल आहे, ज्याचे प्राथमिक उद्दिष्ट नफा कमवणे आहे. दुसरीकडे, चीनमधील AI स्टार्टअप DeepSeek हे open-source मॉडेल्स विकसित करून ज्ञानाचा समान वितरण आणि सर्वांसाठी उपलब्धता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करते.
